top of page
  • Black TripAdvisor Icon
  • Black Facebook Icon
  • Black Instagram Icon
Search

पोपटीची मेजवानी

  • Writer: Anant Mhaskar
    Anant Mhaskar
  • Jan 5, 2019
  • 1 min read

Updated: Jul 25, 2024

पोपटी म्हणजे कोकणातील अनेक वर्षांची परंपरा आहे. थंडी आणि वालाच्या शेंगांचा मातीच्या मडक्यात झालेला सुंदर मिलाप.

साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसर्या तिसर्या आठवड्यापासून ते थेट फेब्रुवारी-मार्च पर्यंत पोपटीच्या मेजवान्या रंगतात.


पोपटी ही हल्ली जरी पार्टी/मेजवानी म्हणुन केली जात असली, तरी ती रात्री शेताची राखण करण्यासाठी जमलेले शेतकरी थंडीपासुन वाचण्यासाठी व जागे राहण्यासाठी विरंगुळा म्हणून केली जाते असे. शेतात ज्या भाज्या, शेंगा मिळतात, रानटी उगवलेला भांबुर्डीचा पाला व घरुन पक्त मीठमसाला आणुन हे शेतकरी पोपटी करतात. ही पिढ्यान् पिढ्या चाललेली कोकणी परंपरा कुटुंब, पाहूणे, मित्र अशा सर्वांना बोलावून अजुनही साजरी केली जाते. पोपटी मडक्यात भरून ती शिजेपर्यंत अर्धा-पाऊण तास वेळ लागतो. यादरम्यान धमाल गप्पा रंगतात, जुन्या आठवणी, गाण्यांच्या घरगुती मैफिली यांची रंगत औरच असते.


पोपटी ही शाकाहारी व मांसाहारी या दोन प्रकारात केली जाते. वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, रताळी, वांगी, बटाटे यांना मीठ मसाला लावून घेतले जाते. मडक्याच्या बुडात भांबुर्डीचा पाला घालून त्यात भाज्यांचे थर दिले जातात. मांसाहारी प्रकारात चिकनला मसाला लावून केळीच्या पानात बांधून मडक्यात घातले जाते. मडक्याचे तोंड पाल्याने नीट झाकले जाते व ते उलटे ठेवून बाजुला गवत व सुकलेली लाकडे लावून शेकोटी पेटवली जाते. 20 मिनिटानी मडके बाजुला काढून पोपटी मोठ्या परातीत काढून त्याचा फडशा पाडायचा.


अशा पोपटीचा आनंद घेण्यासाठी एखादा कोकणी शेतकरी मित्र असावा लागतो, किंवा नेरळ नजीक वृंदावन मधे (कृषी पर्यटन केंद्र ) पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी जरूर जाऊन यावे.


त्यासाठी वृंदावनशी संपर्क करा - 88502 81859

पोपटीची मेजवानी


 
 
 

1 Comment


Anuradha Bhadsavle
Anuradha Bhadsavle
Jan 08, 2019

वृंदावनात, हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत पोपटीची मज्जा काही औरच असते बाकी.भांबुर्डीच्या पानांनी सुगंधित, वाफळलेल्या वालाच्या शेंगा, तिखट मिठात शिजलेल्या कांदे, बटाटे, चवळीच्या शेंगांची अवीट चव मनात अजून रेंगाळतेय।

Like
bottom of page