top of page
  • Black TripAdvisor Icon
  • Black Facebook Icon
  • Black Instagram Icon
Search

पळस फुले आणि पक्षी निरीक्षण...

  • Writer: Anant Mhaskar
    Anant Mhaskar
  • Jan 17, 2023
  • 1 min read

पळस म्हटले की एक म्हण नक्कीच आठवते... पळसाला पाने तीन! पण पळसाच्या पानांपेक्षा फुलेच जास्त लक्षात राहतात.... याचे कारण म्हणजे पळस फुलांचा मोहक आकार आणि गडद केशरी रंग! जंगलातला फुललेला पळस क्षणात लक्ष वेधून घेतो...


हा रंग पक्ष्यांना सुद्धा आकर्षून घेतो बरं का! खरं तर पक्ष्यां

ना मोह पडावा म्हणूनच पळसाची फुले गर्द केशरी रंगाची असतात... पळस हे पक्षांकडून परागीकरण (bird pollinated) होणारे झाड आहे. लाल, केशरी हे रंग मध माश्यांना नीट दिसत नाहीत, त्यांना आकर्षित करत नाहीत. ह्याचे कारण असे, की मध माश्या येऊन मध संपवून टाकू नये! या फुलांमध्ये खूप मध असतो आणि तो पक्ष्यांसाठी असतो... म्हणून निसर्गाचा हा घाट! आणि या सुमारास पळस फुललेले आहेत आणि त्यावर अनेकविध रंगाचे पक्षी येऊन त्यातल्या मधाचा अस्वाद घेत आहेत...

तुम्हाला जर या पक्ष्यांची लगबग पहायची असेल, तर वृंदावन मधे अवश्य या...


संपर्क - 0885028185


 
 
 

Comments


bottom of page